मला कोरोना झालाय या नैराष्यातून 65 वर्षीय वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्त्या ; भिगवण येथील घटना

मला कोरोना झालाय या नैराष्यातून 65 वर्षीय वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्त्या ; भिगवण येथील घटना

भिगवण || कोरोना महामारिचे वास्तव किती भीषण आहे आणि यामुळे रुग्ण कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचा प्रत्येय देणारी घटना पुण्याच्या भिगवण मध्ये घडली आहे. मला कोरोना झाला आहे या नैराष्यातून एका 65 वर्षीय वृध्दाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवणयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत मृत व्यक्तीचा मुलगा दत्तात्रय प्रकाश भगत यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.त्यानुसार भिगवण पोलिसांनी सी.आर.पी.सी.174 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याबाबात भिगवण पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की,खबर देणार दत्तात्रय प्रकाश भगत यांचे वडील प्रकाश विष्णुपंत भगत वय 65  वर्षे रा. राशीन रोड, हाऊस रूम नं 53 भिगवण ता.इंदापुर जि.पुणे यांनी 8 दिवसापुर्वी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर ते गेले 4 ते 5 दिवसापासुन ते आजारी होते. त्यांना घसा दुखणे,अंग दुखणे,खोकला येणे अशी लक्षणे असल्याने ते भिगवण येथील सरकारी दवाखान्यामधुन गोळया औषधे खावुन गरम पाणी पित होते.त्यांना कोरोना या आजाराची लक्षणे होती.

त्यामुळे मुलगा दत्तात्रय भगत यांनी त्यांना कोव्हीड -19 ची टेस्ट देखील करायला लावली होती.परंतु त्यांनी कोरोना टेस्ट केली नाही.दि.24 एप्रिल 21 रोजी 08 वाजताचे सुमारास घरातील सर्वांनी जेवण केले. प्रकाष विष्णुपंत भगत हे देखील जेवण करून घराचे किचण मध्ये झोपी गेले. दि.25 एप्रिल 21 रोजी सकाळी 06/30 वाजताचे सुमारास त्यांनी किचन मध्ये फॅनसाठी असणाऱ्या हुकाला सुती दोरीच्या साहयाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

मयत प्रकाश विष्णुपंत भगत यांना कोरोनाची लक्षणे असल्याने ते सतत मानसीक तणावाखाली होते.त्यांना कोरोना झाला आहे याच्या नैराष्य मधून त्यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली असावी असा अंदाज त्यांचा मुलगा दत्तात्रय प्रकाश भगत यांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लोंढे हे करीत आहेत.