कौतुकास्पद || पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने वाचवला एकाचा जीव

कौतुकास्पद || पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने वाचवला एकाचा जीव

पंढरपूर 03 (राजरत्न बाबर) // पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोपाळपूर येथील एका सत्तावीस वर्षीय व्यक्तीने घरगुती वादावरून मी विष पिऊन आत्महत्या करत आहे असे नातेवाईकांना फोन करून कळवले होते व तो फोन कोणाचा घेत नव्हता. संजय सुदाम गुरव असे त्याचे नांव असून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या प्रयत्नामुळे त्याचा प्राण वाचला आहे.

याबाबत दत्तात्रय पांडुरंग गुरव पुजारी गोपाळपुर यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना सदर इसम अशा पद्धतीने वागत आहे याची कल्पना दिली. त्याचा फोन नंबर देऊन लोकेशन घेऊन अधिक तपास करावा याची विनंती केली.पोलीस निरीक्षक अवचर यांनी तात्काळ सायबर सेल सोलापूर ग्रामीण नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई आत्तार यांना माहिती दिली. व त्यांनी एक मिनिटात लोकेशन प्राप्त करुन दिले.

सदर व्यक्तीचा शोध घेतला असता गोपाळपूर स्मशानभूमी येथे सदर व्यक्ती  हा विषाची बाटली घेऊन पिण्याच्या तयारीत असताना मिळून आला व त्याचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी पो.नि.किरण अवचर व त्यांच्या स्टाफ चे आभार व्यक्त केले.