खाकीतील माणुसकीचे दर्शन ; बेवारस मृतदेह दोन किलोमीटर खांद्यावरुन वाहून नेत तिने केले अंत्यसंस्कार 

खाकीतील माणुसकीचे दर्शन ; बेवारस मृतदेह दोन किलोमीटर खांद्यावरुन वाहून नेत तिने केले अंत्यसंस्कार 

हैद्राबाद 02 // बेवारस मृतदेहाला हात लावण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे प्रकार अनेक वेळा समोर येतात. परंतु, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बेवारस मृतदेह स्वत:च्या खांद्यावर  दोन किलोमीटर वाहून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता त्या अधिकाऱ्याने बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले आहेत.  

आंध्र प्रदेशमधील या घटनेनं सर्वांचं मन जिंकलं आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक कोट्टुरू सिरीशा यांनी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेतला आणि जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करत त्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्या. आंध्र प्रदेश पोलिसांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशिबुग्गा पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहे. अदवी कोथरू परिसरात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. सिरीशा तिथं तात्काळ धावून गेल्या. तिथल्या स्थानिकांना त्यांनी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यात आपली मदत करावी अशी विनंती केली. पण कुणीच त्यांच्या मदतीला आलं नाही. मग काय सिरीशा यांनी मृतदेह आपल्या खांद्यावर घेतला आणि सरळ चालू लागल्या.याबातचे वृत्त सौ.सरकारनामा ने दिले आहे.