तब्बल दीड वर्षानंतर इंदापूर तालुक्यातील 157 शाळा सुरू  - गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत  

तब्बल दीड वर्षानंतर इंदापूर तालुक्यातील 157 शाळा सुरू  - गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत  

इंदापूर || राज्यभरात गेल्या दिड वर्षापासून बंद असलेली शाळेची घंटा सोमवार दि.04 आँक्टोंबर पासून वाजली असून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार इंदापूर तालुक्यातील 157 शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या आहेत. कोरोनाजन्य स्थितीमुळे तब्बल दीड वर्षे विद्यार्थी आणि शाळा यांच्यात अंतर होते,मात्र शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता.तालुक्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

इंदापूर तालुक्यातील 157 शाळात इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे 52839 इतके विद्यार्थी असून पहिल्या दिवशी 28292 इतक्या विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. 

इंदापूर तालुक्यात 157 शाळा असून या शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या 1988 इतकी आहे.त्यापैकी 1714 शिक्षकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.कोरोनाची लाट अद्याप ओसरली नसल्याने प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याला मास्क वापरणे बंधनकारक आहे.शिवाय दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे सामाजिक अंतर राखण्याच्या सुचना प्रत्येक शाळांना केल्या असल्याचेही गट शिक्षणाधिकारी बामणे यांनी सांगितले.

ते म्हणाले की,तब्बल दिड वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर शाळा सुरु झाल्याने एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात कच्चा आहे किंवा मागे आहे असे दिसून येत असेल तेव्हा उपचारात्मक अद्यापन करुन त्यास अन्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणावे.अशा सुचना मी शिक्षकांना केल्या आहेत.शासनाने घालून दिलेल्या नियमाचे सर्व शाळांत पालन होत आहे.पहिल्याच दिवशी पर्यवेक्षक यंत्रणेमार्फत तशी तपासणी देखील करण्यात आली आहे. मी स्वतः आज काही शाळांना भेट देऊन इतंभुत माहिती घेतली आहे.विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला आहे.

गेल्या दिड वर्षापासून विद्यार्थ्यांचे कोरोमुळे नाही म्हटले तरी थोड नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान आपणा सर्वांना पुन्हा भरुन काढून मोठ्या जोमाने शिक्षणाची दालनं सुरु करायची आहेत. यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपले कर्तव्य चोख बजावून विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवादातून पुन्हा त्यांच्या शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. कोरोनाचे सर्व नियम पाळून एखादा विद्यार्थी आपणांस आजारी जानवला तर तात्काळ त्याच्या पालकाशी संपर्क साधून तसे कळवावे जेणे करुन इतरांना त्याचा त्रास होणार नाही वअशा सुचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.