मराठा आरक्षण संदर्भात मुंबईत भाजपाची बैठक संपंन्न ; बैठकीस हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती

मराठा आरक्षण संदर्भात मुंबईत भाजपाची बैठक संपंन्न ;  बैठकीस हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती

मुंबई || मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील या बैठकीस उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ज्ञाची समिती स्थापन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, गिरीश महाजन, श्रीकांत भारतीय, राणा जगजीतसिंह पाटील, प्रसाद लाड या बैठकीला उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातील युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभ्यासपूर्ण आपली मते व्यक्त केली.