भिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीदिनी अभिवादन

भिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीदिनी अभिवादन

इंदापूर || मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची ४२४ वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस,दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेतील सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता नियमांचे पालन कार्यक्रम स्थळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.