ब्रेकिंग || इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या पतीचे निधन

ब्रेकिंग || इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या पतीचे निधन

इंदापूर || एक संयमी नेतृत्व मितभाषी, अत्यंत शांत स्वभावाचे असे डॉक्टर शरद नामदेव पडसळकर (वय ४५वर्षे ) यांचे कोरोना आजाराशी झुंज देताना दुःखद निधन झाले.ही वार्ता आज बुधवारी २१ एप्रिलला दुपारी कानी पडताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अनेकांनी आपले स्टेटस ठेवून डॉक्टर पडसळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे .इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर  यांचे ते पती होत. डॉक्टर पडसळकर हे अत्यंत शांत व मनमिळावू वृत्तीचे होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन करण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातभार होता.  माळी समाजाचे एक खंबीर नेतृत्व  म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते.

नुकत्याच झालेल्या काटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील त्यांनी आपल्या घरातील उमेदवार न देता पक्षातील  नेतृत्वाला आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती. काटी ,वरकुटे खुर्द, रेडा ,पंधारवाडी ,वडापुरी, आणि इतरत्र त्यांचा आदर युक्त दबदबा होता.त्यांच्या अचानक जाण्याने खासदार सुप्रिया सुळे , राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा राष्ट्रवादी महिलाध्यक्षा  वैशालीताई नागवडे, उपाध्यक्ष रेहाना मुलाणी यांनी शोक व्यक्त केला आहे.

डॉक्टर पडसळकर यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इंदापूर येथून अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  डॉक्टर पडसळकर हे आपल्या मोबाईलच्या स्टेटसच्या माध्यमातून विश्रांतीची गरज आहे. फोन करू नये असे मेसेज लिहून उपचार घेत असल्याचे स्टेटस द्वारे सर्वांना सांगत होते.आज सकाळी देखील त्यांनी आपले स्टेटस ठेवून अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे स्टेटस ठेवले होते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे .