राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळच्या आमदारांसह इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीला कोरोनाची लागण.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळच्या आमदारांसह इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीला कोरोनाची लागण.
Coronavirus

इंदापूर ता.24 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळच्या आमदारांसह इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीला कोरोनाची लागण झाल्याची माहीती इंदापूरचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

मोहोळचे आमदार हे पुण्यातील खाजगी रूग्णालयात आज सकाळी उपचारासाठी दाखल झाले आहेत.तर इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती यांच्यावर भिगवण येथील कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात येत आहेत.मुळचे इंदापूर तालुक्यातील रहीवासी असलेले मोहोळचे आमदार यांना शारिरीक त्रास जाणवू लागल्याने इंदापूर कोवीड सेंटर त्यांची आज दि.24 रोजी रॅपीड तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला. तर दि.22 आॅगस्ट रोजी पंचायत समितीचे उपसभापती यांच्या घशातील स्त्रवाचा नमुना तपासणी पाठवला होता.त्याचा अहवाल आज दि.24 रोजी प्राप्त झाला असून त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.