समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव साजरा

समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव साजरा

इंदापूर || इंदापूर मधील समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी करण्यात आली. दादा राऊत गुरुजी , संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणी राऊत , शितल शहा ,सौ. आकांक्षा शहा व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी आकांक्षा शहा यांनी जिजामातेची भूमिका साकारली व बाल कलाकार समीक्षा, श्रेय, श्रावी, साची, रुगवेद यांनी मावळ्यांची भूमिका साकारली होती.दरम्यान  रोहिणी राऊत, आकांक्षा शहा, विजया गोसावी, श्रद्धा पाचंकर (आरोग्य सेविका), माधुरी देशपांडे, अल्का आगरखेड, समृध्दी आगरखेड, पूजा लोहार यांनी मिळून शिव जन्माचा पाळणा गीत गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.