इंदापूर शहरात महिला दिनी 124 महिलांची मधुमेह तपासणी - सभापती अनिकेत वाघ

इंदापूर शहरात महिला दिनी 124 महिलांची मधुमेह तपासणी - सभापती अनिकेत वाघ

इंदापूर 08 // राधिका महिला बचत गटाच्या माध्यमातून व इंदापूर नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अनिकेत अरविंद वाघ यांच्या पुढाकारातून महिला दिनाचे औचित्य साधून इंदापूर शहरात राहणाऱ्या महिलांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.याचे उद्घाटन सौ.शोभा मधुकर भरणे,सौ.सुनीता अरविंद वाघ व सौ.सविता सुहास बंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्यांना मधुमेह किंवा इतर आजार आहेत असे रुग्ण कोरोना व्हायरस विषाणुजन्य आजारास सर्रास बळी पडत असल्याने दिसून आल्याने शहरातील नागरिकांना  मधुमेह आहे का नाही हे जाणून घेऊन व पुढील उपचार घेण्यासाठी हे मोफत मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आल्याचे सभापती अनिकेत वाघ यांनी सांगितले आहे.

या तपासणी शिबीरात १२४ महिलांनी सहभाग नोंदवला.यासाठी श्री स्वामी समर्थ पॅथॉलॉजी लॅब मार्फत तपासणी करण्यात आली.शकीला सय्यद,सौ.गलांडे,सौ.पांढरे व श्री.हनुमंत जाधव यांनी प्रशासनास सहकार्य करून व कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.