काटी वडापूरी जिल्हा परिषद गटात भजन साहित्याचे वितरण

काटी वडापूरी जिल्हा परिषद गटात भजन साहित्याचे वितरण

इंदापूर 06 // पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबीले यांच्या हस्ते काटी वडापूरी गटातील वारकरी सांप्रदायाला विविध गावात भजन साहित्याचे वितरण करण्यात आले. यात शिवशंभो भजनी मंडळ ,पिठकेश्वर, शिव महादेव भजनी मंडळ खबाले वस्ती , महादेवनगर (शहा),जय हनुमान भजनी मंडळ जाधव वस्ती , तरंगवाडी,संत तुकाराम भजनी मंडळ,गोखळी व भांगे-ननवरे वस्ती भजनी मंडळ ,तरटगांव या गावांचा समावेश आहे.

पुणे जिल्हा परिषदेने भजनी मंडळ साहित्य वितरणाची सुंदर योजना राबवली असुन यामध्ये टाळ-मृदुंग,हार्मोनियम आणि पक्वाज अशा वस्तूंचा समावेश आहे. याचा उपयोग गावागावातील  गावांमधील हरिनाम सप्ताहातील वारकरी संप्रदायाला होत असल्याने वारकरी सांप्रदाया मधून समाधान व्यक्त होत आहे.