महापरिनिर्वाण दिनानिमित्त जंक्शन येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जंक्शन येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

इंदापूर || महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर रोजी   इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे सचिव अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य तथा प्रभारी भाजपा अनुसूचित जाति मोर्चा बारामती लोकसभा मतदार संघ संतोष कांबळे   यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा जंक्शन येथे प्रतिमापूजन आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रसंगी प्रतिमापूजन इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, इंदापूर तालुका ओबीसी नेते युवराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी इंदापूर तालुका अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीश भोसले, पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष ललित होले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय बनसोडे, उपाध्यक्ष सौ प्रणाली विशाल बनसोडे, विस्ताराधिकारी हजारे, शाळेचे मुख्याध्यापक विलास धाईंजे, शिक्षिका सौ.सुशीला काळे,सौ मंदाकिनी लोंढे, सौ.शरयू कुमठेकर, हनुमंत ठोंबरे, धम्मपाल सरवदे, राजू जाधव आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.