भाजपा व्यतिरिक्त इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाही का? मंत्री छगन भुजबळांचा संतप्त सवाल

भाजपा व्यतिरिक्त इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाही का? मंत्री छगन भुजबळांचा संतप्त सवाल

नाशिक दि.07 //  कुठलेही मुद्दे हाती घेऊन राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणे योग्य नाही. देशात फक्त भाजपाचे राज्यकर्ते म्हणून राहणार का? इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाही का? असा संतप्त सवाल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. येवला दौऱ्यावर असताना भाजपाच्या धार्मिक आघाडीकडून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सध्या कुठलेही मुद्दे हाताशी घेऊन भाजपा राज्य शासनाला अडचणीत आणण्याचे कारस्थान करत आहे. केवळ राजकारणासाठी देवाला हाताशी धरण्याची भाजपाची जुनी सवय आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. एकीकडे गोमाता म्हणायचे आणि गोव्यात जाऊन गोमांस सेवन करायचे, यात कसले आले हिंदुत्व? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.