अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा  प्राविण्य मिळवा  - भाऊसाहेब ढोले 

अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा  प्राविण्य मिळवा  - भाऊसाहेब ढोले 

पिरंगुट || विद्यार्थ्यानी आपले ध्येय निश्चित करण्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.सध्य परिस्थिती मध्ये  अभ्यासाबरोबरच क्रीडा व खेळ यांना सुद्धा खूप महत्व प्राप्त झालेले आहे. त्यासाठी सरकारी नोकरीत राखीव कोटा देखील आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबरच खेळ व  त्यात प्रावीण्य प्राप्त करणे हे गरजेचे आहे  असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी केले 

पिरंगुट चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सूस शाखेमध्ये वार्षिक क्रीडा दिन व इतर पारितोषिके व पदक आणि प्रशस्तिपत्रक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न  झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोल हे उपस्थित होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे,राष्ट्रीय कुस्तीवीर गणेश मोहोळ,माजी संघटिका ज्योती चांदेरे,संदीप ढमढेरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल,सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडीत,पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी व आदी मान्यवर उपस्थित होते. 
                    
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल,संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.तर संपूर्ण पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

खेळाने माणूस घडतो बरेच पैलू खेळाने विकसीत होत असतात.त्यामुळे खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.परंतु त्याबरोबरच अभ्यासात देखील गुण मिळवून अव्वल येण्याचे ध्येय असले पाहिजे.- संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल