इंदापूरातील जेतवन बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

इंदापूरातील जेतवन बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

इंदापूर || येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मधील जेतवन बुद्ध विहारात ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. 

सुरुवातीला सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस श्रीनिवास शिंदे व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष डाॅ. जीवन सरवदे व इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिपप्रज्वलन केले. 

याप्रसंगी प्रा. बाळासाहेब मखरे,सतिश सागर, रविंद्र चव्हाण, मुकादम बापुराव मखरे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. सुहास मखरे, ॲड. सुरज मखरे, फकीर पठाण, ललेंद्र शिंदे, संतोष मखरे, तुषार मखरे, सर्जेराव मखरे, अक्षय मखरे, सुहास मखरे, पवन मखरे, बोधिसत्व मखरे, सिद्धांत खरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर शहर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर सुत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मखरे यांनी केले.