हर्षवर्धन पाटील रविवारी साधणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

हर्षवर्धन पाटील रविवारी साधणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

इंदापूर || महात्मा फुलेनगर (बिजवडी ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.12 ) ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी 5 ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संवाद बैठकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले आहे.

या बैठकांमधून हर्षवर्धन पाटील हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संचालक मंडळासह संवाद साधणार आहेत. सदरच्या बैठका पुढील 5 ठिकाणी होणार आहेत. 1) सरडेवाडी :- मारुती मंदिर - वेळ सकाळी 9 वा.  2) शिरसोडी :-  नानासो केरबा व्यवहारे विद्यालय - वेळ सकाळी 11 वा.  3) कालठण नं. 1:- भैरवनाथ मंदीर - वेळ दुपारी 2 वा.  4) भिगवण :- विठ्ठल -रुक्मिणी मंगल कार्यालय- वेळ दुपारी 3.30 वा.  5) पळसदेव :- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर - वेळ सायंकाळी 5 वा., या वेळेनुसार होणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष शहा व कार्यकारी संचालक लोकरे यांनी दिली.

या संवाद बैठकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम उपस्थित होत्या.