सी.सी.टी.व्ही.कॅमेरा पाहताच त्याने मारली कल्टी ; इंदापूर शहरातील घटना कॅमेऱ्यात झाली कैद

सी.सी.टी.व्ही.कॅमेरा पाहताच त्याने मारली कल्टी ; इंदापूर शहरातील घटना कॅमेऱ्यात झाली कैद

इंदापूर || इंदापूर शहरातील कालठण नंबर 2 रस्त्यावर एमएसईबी कार्यालयासमोरील प्रा. भास्कर गटकुळ यांच्या बंगल्याबाहेर शुक्रवारी रात्री 8 वाजून 40 मिनिटांचे दरम्यान  एक संशयित व्यक्ती नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा स्कूटी वरुन आला. त्याने गेट मधून प्रवेश केला आपली दुचाकी पार्क केली. त्याच्यासोबत एक मोठी बॅग देखील होती.त्याने गेटच्या आत प्रवेश करुन दरवाजाच्या दिशेने काही पावले टाकली मात्र दारातील सी.सी.टी.व्ही पाहिले अनं आपण कॅमेऱ्यात कैद होतोय हे लक्षात येताच तात्काळ धूम ठोकली. 

गटकूळ यांच्या घरी कार्यान्वित असणाऱ्या सी.सी.टी.व्ही यंत्रणेत या अनोळखी व्यक्तीचा व्यक्तीचा येण्या-जाण्याचा व्हीडीओ चित्रित झाला आहे.प्राध्यापक भास्कर गटकुळ व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांची सुशिक्षित कुटुंब म्हणून शहरात ओळख आहे.या कुटुंबाचे  सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.त्यांच्याच बंगल्यावर असा प्रकार घडल्याने याची परिसरात चर्चा रंगली गेली.

दरम्यान कोणीही घाबरुन न जाता प्रत्येकाने आपापल्या परीने आपली व कुटुंबातील सर्वाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रा.भास्कर गटकुळ व प्रा. डॉ.जयश्री गटकुळ यांनी केले आहे.