तीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे ; होन्नाम्मांची कहाणी

तीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे ; होन्नाम्मांची कहाणी

हैदराबाद || पोलीस ठाणे म्हटले की सामान्य माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. साधी तक्रार करायलाही जायला मन धजावत नाही.मात्र, एका महिलेने पोलीस स्टेशनला आपले घर बनवले आहे. चाळीस वर्षांपूर्वी ही महिला रेल्वे पोलिसांना रेल्वे स्टेशनवर मिळाली. तेव्हा तिचे वय २० वर्ष इतके होते. पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले, विषेश म्हणजे तिला बोलता आणि ऐकता ही येत नव्हते. याबाबतचेे वृृृृृत्त सौ.ई.टी.व्ही.भारत ने दिलेय.

यानंतर पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला,पोलिसांनी तिचे नांव होन्नाम्मा असे ठेवले.आणि तिने तिथेट तिचे घर उभे केले. तिचे नाव  ठेवले. गेल्या तिस वर्षापासून होनाम्मा या पोलीस स्टेशनमध्येच राहत असून तिथेच काम करतात. या पोलीस ठाण्यात आतापर्यंत कितीतरी पोलीस अधिकारी आले आणि गेलेही, मात्र होन्नाम्मांचे नाते पोलीस स्टेशनसोबत जुळलेले नाते आजही कायम टिकून आहे.