सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीच भेटलेलो नाही ; अजितदादांचा पलटवार

सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीच भेटलेलो नाही ; अजितदादांचा पलटवार

पंढरपूर || वाझेने केलेले आरोप धांदात खोटे असून त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून दूध का दूध और पाणी का पाणी जनतेसमोर येऊ द्या. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन वाझेंनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडण करित पलटवार केला आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी(दि.08) रोजी पंढरपूर दौऱ्यावर होते.त्यावेळी कल्याणराव काळे यांच्या फार्महाऊसवर अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांनी सचिन वाझेंनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले. सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. त्याचे माझे संभाषण कधी झालेच नाही, तरीदेखील हा माणूस माझ्यावर आरोप करतो आहे. त्याचे हे आरोप ऐकून मला हसू आले असे अजित पवार म्हणाले.

राज्यातील सरकार अस्थिर करण्याच्या हा हेतू असून अशी  कटकारस्थाने रचली जात आहेत. जनतेलाही माहीत आहे की यामध्ये भाजपच्या नेत्यांचा हात आहे.मात्र महाविकास आघाडी सरकारला याचा कोणताही धोका नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.