भाग्यश्री बंगलोत बाप्पा विसावले ; कोरोनातून मुक्ती दे बाप्पा चरणी पाटील यांचे साकडे.

भाग्यश्री बंगलोत बाप्पा विसावले ; कोरोनातून मुक्ती दे बाप्पा चरणी पाटील यांचे साकडे.

इंदापूर ता.22 : संपूर्ण राज्यासाठी आनंदाचा उत्सव असणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा मात्र तो कोरोनाची वक्रदृष्टी आहे. त्यामुळे बाप्पा च्या आगमणावेळीचा जल्लोष यावर्षी मात्र पहायला मिळणार नाही. मात्र असे असले तरी परंपरेनुसार गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होताना दिसत आहेत. राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मधील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी देखील गणपती बाप्पा मंगलमय वातावरणात विराजमान झाले आहेत. 

हा आनंदाचा क्षण असून मी नतमस्तक होऊन गणरायाचे स्वागत करतो. दुर्दैवाने मागील सहा महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे. अनेक जन यामध्ये अनेकजन जग सोडून गेले आहेत. त्यांच्या कुटूंबाला दुख:तून सावरण्याची शक्ती गणरायाने द्यावी. सर्वांना सुखी समाधानी ठेवावे.पुढील काळात आपणाला जास्तीची काळजी घ्यावी लागणार आहे.यास धैर्याने तोंड देता यावे एवढीच प्रार्थना गणराया चरणी अशाही हर्षवर्धन पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात व मंत्रमुग्ध वारावरणात विधीवजा पुजाअर्चा करुन मोठ्या थाटात पाटील परिवाराकडून बाप्पांचे स्वागत करण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,निराभीमाचे संचालक पुत्र राजवर्धन पाटील,जिल्हा परिषद सदस्या कन्या अंकिता पाटील व जिजाऊ महीला फेड्रेशनच्या अध्यक्षा पत्नी भागश्री पाटील या सर्वांनी मिळून विधी,पुजाअर्चा व आरतीसह गायत्री मंत्र पठण करुन बाप्पाचे स्वागत केले.