पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारताचं जिल्हाधिकाऱ्यांची इंदापूरच्या कोवीड सेंटरला भेट ; अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबती.

पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारताचं जिल्हाधिकाऱ्यांची इंदापूरच्या कोवीड सेंटरला भेट ; अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबती.
Covid-19 CCC INDAPUR

इंदापूर ता.22 : पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर केवळ चारच दिवसात जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी आज दि.22 आँगस्ट रोजी इंदापूर शहरातील कोवीड केअर सेंटरला भेट देत तेथील सोयी सुविधांची व होत असलेल्या अंलबजावनीची पाहणी केली. या दरम्यान जिल्हाधिकारी देशमुख यांनी इंदापूर तालुक्यातील उपस्थित अधिका-यांवर प्रश्नांची सरबती केली. यावेळी प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्तराला निरूत्तर ठरत असल्याने दिसून आले. त्यामुळे इंदापूरच्या कामकाजावर जिल्हाधिकारी असमाधान कारक असल्याने दिसून आले.

 जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांसह गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, डॉ. शिंदे, डॉ. विनोद राजपुरे, वृषाली नवगिरे उपस्थित होते. 

तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या याबद्दल तुम्ही काय उपाययोजना करणार?  असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला असता प्रशासनाचे अधिकारी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहण्या व्यतिरिक्त काहीच करु शकले नाहीत.  त्यानंतर देशमुख यांना कोवीड सेंटर परिसरात रुग्णवाहीका दिसून आली नाही. त्यावर रुग्णवाहीका कुठे आहे असा प्रश्न विचारला.शिवाय डाँक्टरांच्या कार्यालयील कामकाजाचे रजिस्टर कुठे आहे? उपलब्ध खाटा, स्त्राव नमुने संकलन, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन ,रुग्णांचे नाव, संख्या व औषध रजिस्टर, रुग्णवाहिका उपलब्धता,ऑक्सिजन बेडची संख्या, अतिदक्षता विभागातील सुविधा, व्हेंटिलेटर या विषयी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी इंदापूर प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसले नाही. कोविड सेंटर मध्ये रुग्णवाहिका दिसून न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा चेहरा प्रश्नार्थक झाला.  

तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला असता प्रशासनास त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. औषध नोंदवही सेंटरमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून आल्याने अधिकारी कावरे बावरे झाले. यावेळी कोविड केंद्रातील रुग्णांची मात्र भेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही. नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान इंदापूरची परिस्थिती जानून घेतली यावर आपण समाधानी आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता  जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलणे मात्र टाळले.

"कोरोना रुग्णांची तालुक्यातील वाढती संख्या लक्षात घेता उप जिल्हा रुग्णालयातील नियोजित कोविड सेंटर 15 दिवसात सुरू करण्याचे सूतोवाच करत त्यांनी पदभरतीचे तत्काळ आदेश दिले."