जिद्दीच्या बळावर मिळवला अर्जुन पुरस्कार,सुयश जाधव यांचे हर्षवर्धन पाटलांकडून कौतुक.

जिद्दीच्या बळावर मिळवला अर्जुन पुरस्कार,सुयश जाधव यांचे हर्षवर्धन पाटलांकडून कौतुक.
Sujay jadhav & Harshavardhan Patil

इंदापूर ता.25 : जिंकण्याची जिद्द आणि चिकाटी सोबत असेल तर आकाशही ठेंगणे पडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील  जलपट्टू सुयश जाधव हे होय. वयाच्या अकराव्या वर्षी एका अपघातात दोन्ही हात कायमचे गमावून देखील हा योध्दा थेट "अर्जुन" पुरस्काराचा माणकरी ठरला आहे. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे.

2019-20 चा केंद्र सरकारकडून दिला जाणार अर्जुन पुरस्कार यावर्षी जलपट्टू सुयश जाधव यांना जाहीर झाला असल्याने अपंगत्वर मात करुन सुयशने आकाशाला गवसणी घालत आपले नावं इतिहासात नोंद केले आहे. त्या या कामगिरी बद्दल व त्याने मिळवलेल्या यशाबद्दल भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याचा यथोचित सन्मान करुन त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील,पुणे जिल्हा कुस्तिगिर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके,पै.दत्तात्रय पांढरे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुयश जाधव यांचा आदर्श केवळ राज्यानेच नव्हे तर देशातील सर्व युवकांनी घेण्याजोगा आहे.कठोर परिश्रमातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपघातात दोन्ही हात गमावले असतानाही जाधव यांनी हार न मानता आपले लक्ष केंद्रीत केले. आणि राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या वडीलांचे स्वप्न अपंगावर मात करुन मुलाने पुर्ण केले यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो. सुयश जाधव यांनी  अर्जुन पुरस्कारासह राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार असे एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि शेकडो पदके मिळवली आहेत. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केली आहे. 2016 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयश यांनी देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिला. आज त्याला अर्जुन पुरस्कार देऊन त्याच्या जिद्दीचा आणि कष्टाच योग्य सन्मान झाला असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.