त्या नराधमांना तात्काळ फाशी द्या - वंचित बहुजन आघाडीची मागणी.

त्या नराधमांना तात्काळ फाशी द्या - वंचित बहुजन आघाडीची मागणी.

इंदापूर दि.01 // हाथरस (उत्तर प्रदेश) येथील झालेल्या सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याबाबत इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली असून तसे निवेदन इंदापूर तहसील कार्यालय येथे नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांना देण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कांबळे,बापूसाहेब साबळे,दत्तात्रय घोडके,  संजय चंदनशिवे, सुनील गायकवाड,पवन पवार, प्रमोद चव्हाण,राहुल सोनवणे, सागर लोंढे,विकी जगताप, विकास गायकवाड,प्रल्हाद बोबडे आधी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चांदवड परिसरातील एका गावातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर  तिच्यावर दिल्ली येथील समदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र ती दुर्दैवाने वाचू शकली नाही.पीडित मुलीची जीप कापल्याने ती बोलू शकली नाही परंतु तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.