भिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक

भिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक

इंदापूर || गांजाची तस्करी करणाऱ्या एकास भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. तर एकजण पसार झाला आहे. आरोपीकडून 16  किलो गांजासह एक दुचाकी असा सुमारे 3 लाख ६ हजार रुपयांचा  मुद्देमाल भिगवण  पोलिसांनी जप्त केला आहे.अशोक शिवदास पवार वय 21, रा. वांगी, ता. भूम, जि. उस्मानाबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार मात्र  पसार झाला आहे.

भिगवण पोलीस रविवारी दि.19 हद्दीत गस्त घालत  होते. त्यावेळी भिगवण-राशिन मार्गावर दोघे गांजा घेऊन येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांनी पथकासह दुपारी पावणेतीनच्या सुमारास सदर ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी राशिनच्या दिशेने एका दुचाकीवरून दोघे पांढ-या पोत्यात काहीतरी घेऊन जात असताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांना पाहून दोघांनीही पळ काढला. परंतू पोलिसांनी मोठ्या शिताफीने एकास पकडले. तर दुसरा फरार झाला आहे.

जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण  शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार साईराम भिसे, केशव चौधर, आप्पा भांडवलकर, होमगार्ड धुमाळ, सूर्यवंशी यांच्या  पथकाने ही कारवाई केली.