कांदलगावात साऊ-जिजाऊ च्या लेकींनी घेतली स्वच्छतेची शपथ

कांदलगावात साऊ-जिजाऊ च्या लेकींनी घेतली स्वच्छतेची शपथ

इंदापूर || कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमापूजन सरपंच रविंद्र पाटील आणि उपसरपंच तेजमाला बाबर यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव,रेखा बाबर,किसन सरडे,विजय सोनवणे,उल्हास पाटील, ग्रामसेविका स्वाती चव्हाण,दशरथ बाबर,महेश धुमाळ,हनुमंत चव्हाण,गावसमन्वयक निलोफर पठाण उपस्थित होते.

ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.गावातील महिला बचतगटांनी बनवलेले पदार्थ सरपंच रविंद्र पाटील यांना भेट देण्यात आले.यावेळी बोलताना सरपंच रविंद्र पाटील म्हणाले की,कांदलगावातील महिलांनी चालू केलेल्या व्यवसायाला जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कांदलगाव ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे.तसेच इंदापूर येथील "साऊ-जिजाऊ" घरकुल मार्ट येथेही हे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.सद्यस्थितीला कांदलगावातील महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. "खेड्याकडे चला" हा गांधीजीचा हेतु बचतगट चळवळीतून नक्कीच साध्य होईल.

यावेळी विद्या सोनवणे,मुनेरा नायकुडे,स्वाती ननवरे,लक्ष्मी कसबे,फातीमा शेख,दिपाली कांरडे,माधवी काशिद,रेणुका काशीद, शालन सोनवणे,दमयंती राऊत,द्रौपदी जगदाळे, विद्या सरडे  या बचतगटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले तर आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.