एका तासामध्ये त्याने 280 फूट कापून तिरंगा फडकविला ; कृष्णा गायकवाड याचा रोमांचकारी प्रवास

एका तासामध्ये त्याने 280 फूट कापून  तिरंगा फडकविला ; कृष्णा गायकवाड याचा रोमांचकारी प्रवास

सोलापूर 01 (शितलकुमार मोटे) // शिवजयंतीच्या निमित्ताने माळीनगर विकास मंडळ अंतर्गत शौर्य एडव्हेंचेर्स ग्रुप मधुन लहान गिर्यारोहक कृष्णा गायकवाड व त्याचे शिक्षक संजय पवार व सुहास गायकवाड यांनी ठाणे येथील सह्याद्री रांगेतील समुद्र सपाटीपासुन २८० फुट व नव्वद अंशाच्या काटकोनात असनारा वजीर सुळका पूर्ण केला.

या मोहिमेमध्ये वय वर्ष सात ते बारा पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा गायकवाड, अनिकेत शिरस्कर, सिध्दराज देशमुख , देवांश क्षीरसागर व मोहिम प्रमुख संजय पवार आणि सुहास गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. अवघ्या एका तासात कृष्णा गायकवाड यांनी २८० फुटाचा वजीर सुळका पार करून तिरंगा ध्वज फडकवत त्याने  चित्तथरारक वजीर सुळका मोहिम पूर्ण केली.या मोहिमेसाठी नाशिकच्या पी.बी.ए.पथकाचे मार्गदर्शक जॅकी साळुंखे , अमोल, चेतन, दर्शन यांनी परिश्रम घेतले.