नवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडून अधिसूचना जारी - वाचा काय आहेत महत्वाच्या सूचना 

नवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडून अधिसूचना जारी - वाचा काय आहेत महत्वाच्या सूचना 

इंदापूर || नवरात्रोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. संपूर्ण महाराष्ट्र नवरात्रात भक्तीमय वातावरणात दुमदुमून निघालेला असतो. अशा परिस्थितीत इंदापूर शहर व ग्रामिण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने काही सूचना वजा आदेश दिले आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत इंदापूर पोलिस ठाण्याकडून  नवरात्र उत्सव मंडळांना पुढील सूचना करण्यात आल्या आहेत.

 • नवरात्र मंडळ यांनी संबंधित सर्व विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक आहे.
 • नवरात्र मंडळ हे रजिस्टर नसल्यास ते धर्मादाय आयुक्त यांच्याकडून रजिस्टर करण्यात यावे.
 • नवरात्र मंडळाचे मंडप टाकताना  त्यासंबंधी ग्रामपंचायत नगरपरिषद व इतर विभागाचे परवानगी घेण्यात यावी.
 • मंडप टाकताना मूर्तीचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करावे मूर्तीस इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मंडप हा मजबूत असावा.
 • देखावे करताना लायटिंग मुळे शॉर्टसर्किट होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • आरती धूप अगरबत्ती पासून सजावट इस धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • मंडपाचे आत मध्ये तसेच बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे.
 • विद्युत पुरवठा हा अनधिकृत घेऊ नये.
 • देवीची प्रतिष्ठापना वेळेत करावी.
 • नवरात्र मूर्तीचे संरक्षणासाठी 24 तास किमान दोन स्वयंसेवक नेमावेत.
 • करोना च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी पारित केलेले नियम व अटी शर्ती या सर्व मंडळांवर बंधनकारक राहतील.
 • करोना अनुषंगाने मंदिरा मध्ये तसेच मंडळांच्या ठिकाणी कोणत्या ही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • नवरात्र उत्सव काळात मंगलमय वातावरण ठेवावे.
 • देवीच्या गळ्यातील हार नैवेद्य वगैरे खाण्यासाठी गाई शेळ्या कुत्री वगैरे प्राणी येतात त्यांच्यापासून देवीचे मूर्तीला धोका होणार नाही याची दक्षता घेणे.
 • लहान मुले विद्यार्थी वृद्ध लोक तसेच रुग्ण यांना आवाजामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.
 • कोणत्याही वाद्य मुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • मंडपात फायर एक्सटीशुगर ठेवणे किंवा पाण्याच्या वाळूच्या बकेट से ठेवाव्यात.
 • मंडळातील स्वयंसेवक हे ओळखू येण्यासाठी टी शर्ट किंवा टोपी द्यावी तसेच ओळखपत्र देण्यात यावे.
 • माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
 • वेळोवेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे विसर्जन वेळेत संपवावे.

या आहेत अति महत्वाच्या सुचना  - 

 • नवरात्रात देवीच्या अलंकार तसेच इतर मौल्यवान वस्तू साठी खास व्यवस्था असावी.
 • गाभारा अथवा मंडपात प्रकाश व्यवस्था असावी.
 • सी सी टिव्ही ची व्यवस्था असावी.
 • मंडपात अथवा गाभाऱ्यात कायम कमीत कमी 2 स्वयंसेवक असावेत.
 • मौल्यवान वस्तू तसेच अलंकारा साठी स्वतंत्र लॉकर ची व्यवस्था असावी.
 • मौल्यवान वस्तू अगर अलंकार असतील तर ते रात्री चे सुरक्षित लॉकर मध्ये ठेवावेत.
 • मौल्यवान वस्तू अगर अलंकार असणाऱ्या मंडळांनी तसे पोलिसांना आगाऊ माहिती द्यावी.
 • नवरात्र काळात मंडळांचे कडून कोणताही वरील बाबतीत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.