इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

इंदापूर || इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था या ठिकाणी संपन्न झाला.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन वसंत फलफले, सुनिल शिंदे,मोहन भगत,सुनिल चव्हाण,शहाजी पोफळे,छगन मुलाणी,विनय मखरे, नजीर शिकिलकर,विदेश कांबळे,  लतीब तांबोळी, हरिचंद्र कवडे, संजय भोंग,योगराज गाडेकर,भालचंद्र भोसले,कल्पना पवार इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्य (इ ५ वी )शिष्यवृत्ती परीक्षेतचि.अर्णव भोंग, चि.नील गाडेकर व माध्यमिक ( इ ८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षेत कु.श्रेया पवार, चि.आदित्य घुले, चि.साईराज कवडे ,चि.भुषण भगत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.