त्या मायलेकींची आत्महत्या नाही तर खून; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

त्या मायलेकींची आत्महत्या नाही तर खून; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर || 15 एप्रिल रोजी कौटुंबिक वादामुळे माहेरी राहत असलेल्या विवाहितेचा आपल्या 3 वर्षांच्या चिमुकली सोबत त्यांच्याच विहिरीत मृतदेह आढळून आला होता. सुरवातीला या मायलेकींनी आत्महत्या केल्याचा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होत होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर या दोघींनी आत्महत्या केली नाही तर त्यांचा गळा आवल्याने मृत्यू झाल्याचे अहावालातून समोर आलयं.

तेजस्विनी किरण मोरे आणि अक्षरा मोरे (वय 3 वर्ष) असं या मृत मायलेकींचे नांव असून त्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावातील रहिवाशी आहेत.या दोघींचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली असून अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले.

तेजस्विनी कौटुंबिक वादामुळे कोल्हापूर जवळच असलेल्या गडमुडशिंगी गावात आपल्या माहेरी राहत होती. बुधवारी 14 एप्रिल रोजी ती आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचा मृतदेह गावातील त्यांच्या विहरीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.आता या संपूर्ण घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.

तेजस्विनी हिचा 4 वर्षांपूर्वी वसगडे गावातील किरण मोरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्यास अक्षरा नावाची एक मुलगी झाली. मात्र, हळूहळू पती पत्नी मध्ये कौटुंबिक वाद विवाद सुरु झाले. तेजस्विनी गेल्या 2 वर्षांपासून आपल्या माहेरी गडमुडशिंगी या गावी वडील दाजी गुरुले यांकडे राहू लागली.याच दरम्यान घटस्फोटासाठी न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला होता.