कांदलगांवच्या उपसरपंचपदी किसन सरडे ; तर सदस्यपदी आशाबाई तुपसौंदर यांची बिनविरोध निवड

कांदलगांवच्या उपसरपंचपदी किसन सरडे ; तर सदस्यपदी आशाबाई तुपसौंदर यांची बिनविरोध निवड

इंदापूर || कांदलगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किसन बापू सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच तेजमाला बापू बाबर यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच या रिक्त झालेल्या जागी सर्वानुमते किसन सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बुधवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी कांदलगांव गावचे सरपंच रविंद्र पाटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंच पदा करिता किसन बापू सरडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो पात्र ठरल्याने त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी घोषित केले.

यावेळी सदस्य उल्हास पाटील,बाळू गिरी,विजय सोनवणे, रेखा बाबर,कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव, तेजमाला बाबर,आशाबाई तुपसौंदर ,दशरथ बाबर उपस्थित होते.

या निवडीनंतर सरपंच,ग्रामसेवक व सर्व सदस्यांनी नूतन उपसरपंच किसन सरडे यांचा यथोचित सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आपण सरपंच व सर्व सदस्य यांना सोबत घेऊन कांदलगांवच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून सर्व सदस्यांच्या एकविचाराने काम करु अशी प्रतिक्रिया उपसरपंच सरडे यांनी दिली.