आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतले शहरातील चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे दर्शन

इंदापूर : आय मिरर
इंदापूर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या चाँदशाहवली बाबांचा उरुस आगामी काळात डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने रविवारी दि.6 नोव्हेंबर रोजी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन दर्गा परिसराची पाहणी केली.चाँदशावली बाबांचे दर्शन घेतले.यावेळी बाबांच्या दर्ग्या मध्ये सुधारणा करण्याकामी 5 लाख रुपयांचा निधी देऊ असे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,युवक शहराध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद,उरुस कमिटी ट्रस्टचे आझाद पठाण,महादेव चव्हाण, हमीद आतार यांसह झाकीर पठाण, निहाल पठाण आदी उपस्थित होते.