पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील शेतकऱ्यांना मिळणार देय रक्कम - तात्काळ कार्यवाही करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील शेतकऱ्यांना मिळणार देय रक्कम - तात्काळ कार्यवाही करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई || पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील देय असलेली रक्कम  राष्ट्रीय महामार्गच्या कार्यान्वयीन यंत्रणांनी वितरीत करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दतात्रय भरणे  यांनी दिले.मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुणे -इंदापूर या महामार्गासाठी  संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक पार पडली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनाबाबत शेतक-यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे.या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणने कार्यवाही करावी असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.           

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दतात्रय भरणे बोलत होते.यावळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव,पुणेचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस,उपसचिव  वाय. बी. कुलकर्णी, ॲड शीतल चव्हाण,ॲड रितेश कुलकर्णी, ॲड सिध्दार्थ देशमुख,टाटा इन्फ्राचे सुभाष लाखे, राजेश सिरोहीया उपस्थित होते.