सावधान ! इंदापूर शहरात जाताय - या कारणासाठी तुमच्यावर होऊ शकते पोलीस कारवाई

सावधान ! इंदापूर शहरात जाताय - या कारणासाठी तुमच्यावर होऊ शकते पोलीस कारवाई

इंदापूर || राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद काही ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पुण्याच्या इंदापूर मध्ये देखील गेल्या काही दिवसापासून कोरोनाची रुग्ण संख्या फार झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलीसांनी कंबर कसली आहे.

बुधवारी दि. 01 सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील,पोलीस शिपाई अर्जुन नरळे,सुहास आरणे,वाहन चालक जाधव यांनी इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत बिना मास्क संचार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान या फरकाने शहरातील व्यापाऱ्यांना देखील मास्क वापरण्याची सक्त ताकीद दिली असून कोणताही ग्राहक विनामास्क आपल्या दुकाणात प्रवेश करणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही सूचित करण्यात आले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रशासनाने घालून दिलेले सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळण्यासाठी इंदापूर पोलीस शहरात तैनात झाले आहेत. मागील दोन दिवसापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये जे लोक मास्क वापरणार नाहीत किंवा नियमांचे उल्लंघन करतील अशा लोकांवर इंदापूर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती. त्यास अनुसरून इंदापूर पोलीस निरीक्षक तयुब युसूफ मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांची तुकडी आता शहरातून वीणा मास्क मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसत आहे.