इंदापूर महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

इंदापूर महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

इंदापूर : आय मिरर

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कल्पनेतून कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 


यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे उपस्थित होते. तसेच विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला शाखाप्रमुख डॉ. भिमाजी भोर, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे आणि एनसीसीचे 97 कॅडेट्स उपस्थित होते.

पाडुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने पेटून उठून अभ्यासाला लागले पाहिजे, त्यामध्ये प्रामाणिकपणा, सातत्य, चिकाटी, मेहनतीने प्रयत्न केल्यास कोणतेच ध्येय अशक्य नाही. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे यांनी एनसीसी विभागाचा आढावा घेऊन कार्यशाळेचे स्वरूप सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचलन सार्जंट अवंतिका मखरे यांनी केले तर आभार कॅडेट देवेश जळमकर यांनी मानले.

दरम्यान मुंबईमध्ये दि. २९ ऑक्टोबर ते ०८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत हा एनसीसीचा कॅम्प  झाला. त्यामध्ये महाविद्यालयातील सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धी भोंग व ज्युनिअर अंडर ऑफिसर साहिल शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांचा पाडुळे साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धी भोंग, ज्युनिअर अंडर ऑफिसर साहिल शेख, कंपनी हावलदार मास्टर महेश देवकर, सार्जंट रुद्रकुमार गवळी, सार्जंट शिवरत्न लोंढे, सार्जंट शुभम दगडे, CQMS अपेक्षा कुदळे, मोनाली वाघमोडे, अर्जुन शिंदे आणि एनसीसी कॅडेट्सचे योगदान लाभले.