सावता माळी महाराज मंदिरात पूजा आरती करुन कल्याणराव आखाडे यांना दिल्या अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा

सावता माळी महाराज मंदिरात पूजा आरती करुन कल्याणराव आखाडे यांना दिल्या अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा

माढा 08 // सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संत शिरोमणी माढा तालुक्यातील सावता माळी महाराज मंदिरात संत सावता महाराजांची पूजा आरती करुन  केक कापून कल्याणराव आखाडे यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब ढगे,माढा तालुका अध्यक्ष डॉ. भारत कुबेर,माजी सरपंच पांडुरंग राऊत,सावतामाळी अन्नछत्र चे सतीश घाडगे यांसह अनेक गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांनी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या चरणी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना दीर्घायुष्यासह सुख शांती प्रगती,समाधान लाभो अशी प्रार्थना केली.यावेळी संतोष राजगुरू म्हणाले,की आखाडे साहेबांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे.कल्याणराव आखाडे हे माळी समाजाच्या, ओबीसी समाजाच्या विविध  मागणी साठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत. सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करित आहेत. त्यांना दिर्घयुष्य लाभो हीच श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या चरणी प्रार्थना.