पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूर तालुक्यातील या कुटुंबाशी पत्र पाठवून संवाद साधलाय  ; हे आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूर तालुक्यातील या कुटुंबाशी पत्र पाठवून संवाद साधलाय  ; हे आहे कारण

इंदापूर मिरर(विशेष वृत्त) 24 // इंदापूर तालुक्यातील सराफवाडी गावातील नानासाहेब लक्ष्मण धनवडे-पाटील कुटुंबात नोव्हेंबर महिन्यात एक विवाह सोहळा संपंन्न झाला.धनवडे हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आपल्या चिरंजीवाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी नानासाहेब धनवडे यांनी थेट नरेंद्र मोदी यांना पोस्ट खात्यामार्फत पंतप्रधान कार्यालयास निमंत्रण पत्रिका पाठवली होती. याच निमंत्रणास मान देत भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट खात्याव्दारे पत्रव्यवहार करित धनवडे पाटील कुटुंबाशी संवाद साधला आहे.

नरेंद्र मोदी यांनी शुभाशिर्वाद रुपी पाठवलेले पत्र आज दि.24 डिसेंबर रोजी हे नानासाहेब धनवडे यांना प्राप्त झाले असून धनवडे पाटील परिवारातील विवाहासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून शुभाशीर्वाद दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून शुभ संदेश पाठविल्याने धनवडे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ते आपल्या पत्रात म्हणतात, की दीपक आणि वैभवी यांच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी मला बोलवले त्याबद्दल धन्यवाद. नवजीवनाच्या वर वधूस मनापासून शुभेच्छा. हा विवाह तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच विश्वास आणि मैत्रीचा धागा दोघांना सदैव बांधून ठेवेल. तुमच्या नात्यामध्ये स्नेह राहील. जीवनाच्या प्रवासात ते नाते अधिक घट्ट आणि मजबूत व्हावे, सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.