ॲट्रॉसिटीची धमकी देऊन मागत होते खंडणी ; पंढरपूर शहर पोलिसांनी दाखवला जेलचा रस्ता

ॲट्रॉसिटीची धमकी देऊन मागत होते खंडणी ; पंढरपूर शहर पोलिसांनी दाखवला जेलचा रस्ता

पंढरपूर 19 // ॲट्रॉसिटी धमकी देऊन वारंवार खंडणी मागणाऱ्या एका तंटा मुक्ती अध्यक्षासह एका पत्रकारास आणि त्याच्या एका साथीदारास पंढरपूर शहर पोलीसांनी छापा टाकत खंडणी वसूल करताना रंगेहात पकडत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.चंद्रकांत सदाशिव आवटे वय 38 वर्ष धंदा- ड्रायव्हर राहणार- लक्ष्मी टाकळी , पंढरपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तानाजी गोविंद कांबळे रा. लक्ष्मी टाकळी, पंढरपुर( तंटा मुक्त अद्यक्ष), पांडुरंग अहिलाजी शेळके,ज्योतिराम भानुदास कांबळे रा भटुंबरे ता. पंढरपुर(साप्ताहिक पोलीस ऑफिसर ,पत्रकार )यांविरूद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क 384, 385, 388,389,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

पंढरपूर पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की,चंद्रकांत सदाशिव आवटे राहणार- लक्ष्मी टाकळी , पंढरपूर  यास एप्रिल 2019 पासून आरोपी तानाजी गोविंद कांबळे रा. लक्ष्मी टाकळी, पंढरपुर( तंटा मुक्त अद्यक्ष) हा खंडणी मागून ब्लॅकमेल करत होता,त्यात तो कधी जेवण मागून ,कधी पैसे मागून त्यास ब्लॅकमेल करत होता. तुझे वर खोटे जातीवाचक केसेस करतो तात्पुरते 10000 रुपये दे असे म्हणून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे चंद्रकांत सदाशिव आवटे यांनी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कदम यांचे कार्यालयात तक्रारी अर्ज दिला होता.

त्याची चौकशी चालू असतानाच दि.18 डिसेंबर 2020 रोजी आरोपीने फिर्यादिस धमकी देऊन खंडणीची रक्कम मागत असलेबाबत समजले. त्यानुसार लागलीच योग्य ती तजवीज करून दि.18 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 02 वाजून 55 मि.वाजन्याचे सुमारास पंढरपूर येथील श्रीराम हॉटेल मध्ये छापा घातला असता 7000 रुपये घेताना वरील आरोपी मिळून आलेने त्यांच्यावर भा.द.वि.क 384, 385, 388,389,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मुगदुम करित आहेत.