रोहित दादा जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा -  गोपिचंद पडळकर

रोहित दादा जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा -  गोपिचंद पडळकर

इंदापूर दि.10 // भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी औरंगाबादला जाताना, रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावर उतरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे.

रोहित पवार हे नेहमीच आपल्या सोशल मिडीयातून आणि माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराताना पहायला मिळतात.  आपण खूप मोठे नेते झालो आहोत या गैरसमाजात ते आहेत. शरद पवार यांच्या खांद्यावरुन निशाना साधून तुम्ही स्वत:ची उंची मोजू नका. रोहित दादा  जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशा शब्दात गोपिचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टिकास्त्र सोडले. 

'राजा उदार झाला अनं हाती भोपळा दिला' असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लावला होता. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट देखील केले होते. ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होत आहे. परंतु आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” असे  ट्विट रोहित पवार यांनी केले होते. रोहित पवारांच्या या टीकेनंतर भाजप अमदार गोपिचंद पडळकर यांनी थेट कर्जत-जामखेड मतदारसंघात जाऊन उत्तर दिले आहे.