विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत २००० वृक्षांचं मोफत वाटप.

विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत २००० वृक्षांचं मोफत वाटप.
Tree distribution

सातारा ता.26 : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत २००० वृक्षांचं मोफत वाटप नुकतेच करण्यात आले. फलटण तालुक्यात १५ कि.मी अंतरावर ढवळ या गावामध्ये दि.22 आँगस्ट रोजी या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या २००० वृक्षांचं मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पै. तातन वस्ताद ऊर्फ सुहास गोफणे यांनी दिली. 

या कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पै.तातन वस्ताद ऊर्फ सुहास गोफणे यांच्या विनंतीला मान देऊन सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांसह ढवळ गावचे सरपंच आप्पासाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, ह.भ.प.शामराव महराज लोखंडे, माजी सरपंच मनोहर गार्डे,समाजसेवक शंकरराव लोखंडे, डाँ,नवनाथ लोखंडे, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे,   ढवळ विकास सोसायटी चेअरमन संजय घोरपडे, शंभू महादेव सोसायटीचे सेक्रेटरी श्रीरंग काळे,सुनिल लोखंडे,संतोष गायकवाड,शरद लोखंडे,निलेश लोखंडे,जयदीप गायकवाड, हरी शिंदे, रामभाऊ बनकर,पै.नवनाथ लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

फलटण तालुक्यामधील ढवळ या गावाची पैलवानांचे गाव अशी वेगळी ओळख आहे. गावात शासकीय नोकरदार वर्ग जास्त असून या गावामध्ये सामाजिक व शैक्षणिक कामांना चांगल्या पद्धतीचे प्राधान्य दिले जाते. अशातच गणेशोत्सवा निमित्ताने गावातील तरुण वर्ग यांनी एकत्रित येऊन संस्थेसोबत पाठपुरावा केला.संस्थेकडून २००० फळझाडे  घेऊन गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. विद्यानिकेतन संस्थेमार्फत ढवळ  गावामध्ये तसेच ढवळ वाखरी पंचक्रोशीतील गावांमधे वेगवेगळ्या प्रकारची रुपये 60 हजार किमतीची फळ झाडे मोफत वाटप करण्यात आली. यात चिंच, आवळा, जांभूळ, सिल्वरओक, पेरू, तत्सम फुल, कवट इत्यादी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. 

वृक्षारोपण करण्यासाठी फलटण तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुशांत पिसाळ, दत्तात्रय गोफणे,पै.अंकुश लोखंडे, अशोक बोडके,पप्पु लोखंडे,गणेश गुलाब जानकर,मिथुन लोखंडे,पै.अमर लोखंडे, तसेच ढवळ गावच्या जय हनुमान तालीम आखाड्यातील पैलवान मित्र यांची मोलाची साथ लाभली.संस्थेचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष व संस्थेचे सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी ढवळ गावात अशाच प्रकारे अनेक सामाजिक कार्य संस्थेकडून उपलब्ध करून दिली जातील असे आश्वासन दिले. या सर्व कार्यक्रमासाठी गावातील इतर ग्रामस्थ, महिला वर्ग, तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.