शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांचा महिला दिनी सावित्री माई पुरस्कार देऊन गुणगौरव

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांचा महिला दिनी सावित्री माई पुरस्कार देऊन गुणगौरव

इंदापूर 11 // शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांना जागतिक महिला दिनी शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून "सावित्री माई" हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, दीपक जगताप, अमोल राऊत, सुषमा घारगे, वैशाली मासाळ, भारत बोराटे, मंजुनाथ सुंठले आदी उपस्थित होते.

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांच्या संकल्पनेतून दि.03 जानेवारी 2021 रोजी फिरता दवाखाना ही नवखी संकल्पना इंदापूर तालुक्यात राबवण्यात आली. खास करुन ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने देशपातळीवरील पहिला एक आदर्श माॅडेल म्हणून हा प्रयोग राबवण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते व अध्यक्षा पद्मा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन करुन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली.

जानेवारी महिन्यापासून सुरु झालेल्या या उपक्रमातून जवळापास ७० दिवसात ७ हजार ८३० ऊस तोड मजुरांची प्रत्यक्ष शेतात जावून आरोग्याची तपासणी करणारा हा राज्यातील पहिला दवाखाना ठरला. शंकरराव  पाटील चारिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्राथमिक आरोग्य केंद्राने बघता बघता मोठी भरारी घेतली. अगदी नाविण्यपूर्ण असणारी संकल्पना या केंद्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहचवली.त्यामुळे अगदी मोजक्या दिवसात खास करुन ऊसतोड मजूरांसाठी स्थापन केलेले हे केंद्र भल्याभल्यांच्या नजरेत मोठ्या अभिमानाने कैद झाले.

या केंद्रातील समन्वयक महादेव चव्हाण (सर),किरण खंडागळे, संजय शेलार, अमोल जाधव, डॉ. वर्षा बोराडे यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांना “सावित्री माई” पुरस्काराने सन्मानित केले.आपल्या छोट्याश्या संकल्पनेतून आम्ही गरजूवंत आणि कष्टकरी मजुरांना अगदी बांधावर जावून सेवा देऊ शकलो. त्यामुळे आमच्या मनाला सर्वात मोठा आनंद होत आहे आणि या आनंदाचा केंद्रक आपण आहात अशा शब्दात केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी पद्मा भोसले यांचे रुण व्यक्त केले.