राज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी शिवसेनेची मागणी

राज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी शिवसेनेची मागणी

पिरंगुट || महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आवमान करणाऱ्या व शिवरायांच्या नावाचा एकेरी शब्दात उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा धिक्कार असो अशा विविध घोषणा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून या संबंधी तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षण धुमाळ साहेब यांच्याकडे निवेदन देत या निवेदनाद्वारे केलेली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,जि.प.सदस्य शंकर मांडेकर,बारामती लोकसभा मतदार संघाच्या सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले,भोर विधानसभा संघटक,प्रकाश भेगडे,शिवसेनेचे नेते आबासाहेब शेळके,कैलास मारणे,माजी तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,सुरेश मारणे,शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,दिलीप गुरव,महिला आघाडीच्या कांता पांढरे,सुरेखा तोंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागेश साखरे,तुषार पवळे,तालुकाअधिकारी राम गवारे,उपतालुका प्रमुख पांडुरंग निवेकर,वैभव पवळे,नरेश भरम,सरपंच सुनिल वायकर,विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,महादेव वीर,नवनाथ भेगडे,जेष्ठ शिवसैनिक मारुतीबाबा पवार,भारतीय विद्यार्थी सेना सरचिटणीस संतोष लोयरे,उपविभाग प्रमुख रूपेश जाधव,नामदेव तिडके,मानिक जोरी, नितिन लोयरे,शरद यादव,मयूर रानवडे,सुशील तारू व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.