बोतरवाडी ते उरावडे रस्त्याची लवकर दुरुस्ती न केल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

बोतरवाडी ते उरावडे रस्त्याची लवकर दुरुस्ती न केल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पिरंगुट || बोतरवाडी ते उरावडे दरम्यानच्या रस्त्याची अवस्था ही खूपच बिकट झाली असून या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे.तेव्हा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेनेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

बोतरवाडी ते उरवडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेली वर्षभर याठिकाणी दगड खडी आणून टाकलेली आहे परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी कसलेच काम होत नाही.मात्र या कामाची खाजगीमध्येच फक्त चर्चा चालू असते की रोडच्या कामाला निधी आलेला आहे व रोडचे काम लवकरच सुरू होणार आहे पण प्रत्यक्ष मात्र रोडचे काम काही चालु होत नाही.यामुळे या भागातील ग्रामस्थ मात्र हैराण झालेले आहेत.

त्यातच हा रस्ता जागोजागी उखडला गेला असून दोन तीन ठिकाणी तर मोठमोठे खड्डे देखील पडलेले आहेत.त्यामुळे त्याठिकाणी बऱ्याच वेळा छोटे मोठे अपघात देखिल होत असतात.हा रस्ता पिरंगुटच्या ट्रॅफिक वर पर्यायी उपाय म्हणून सुचवला जात आहे.पण याची ही दुरवस्था झालेली आहे.उरवडे पुल ते बोतरवडी गाव टप्यातील हा रस्ता आहे.त्यातच  लवासा व मुठा खोऱ्यात जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर ठरतो आहे.

तेव्हा या रस्त्याचे काम हे लवकरात  लवकर करावे नाही तर शिवसेनेच्या वतीने ठीया आंदोलन करण्याचा इशारा तालुका संघटक अमित कुडले,माजी सरपंच दिलीप गोळे,माजी उपसरपंच रामदास कुंभार,उपतालुका संघटक दत्ताभाऊ काळभोर,अरुण वीर,मोहन आवळे,संतोषी ताई मारणे,उपविभाग प्रमुख सागर गुजर,शाखा प्रमुख विजय बोत्त्रे यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या वतीने या ठिकाणच्या खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध देखील व्यक्त करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ अभिषेक गुजर रमेश शेलार,मधुकर शेलार, गणेश गुजर अण्णा गोळे,मनोहर निंबाळकर,समीर गुजर ,अनंता गुजर उपस्थित होते.