घोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

घोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

पिरंगुट || घोटावडे फाटा (ता,मुळशी) येथील शिवशक्ती चौकामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

शिवजयंती निमित्त घोटवडे फाटा येथील शिवशक्ती चौकामध्ये ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते त्याचबरोबर सकाळपासूनच शिव गीते व पोवाडे यांच्या ध्वनीने तर संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

तेव्हा मोठया उत्साहामध्ये पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,माजी सभापती महादेव कोढंरे,मंडळाचे संस्थापक नानासाहेब शिंदे,माजी उपसभापती भानुदास पानसरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडु काका करजांवणे,मडंळाचे अध्यक्ष राम गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत व पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.गेली 36 वर्षा पासुन घोटावडे फाटा येथील शिवशक्ती चौकामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राम गायकवाड यांनी यावेळी दिली.

तेव्हा या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,माजी सभापती बाबासाहेब कधांरे,युवा सेनेचे मयुर भांडे,रुची कंपनीचे संचालक गौतम खारकर,सुहास दगडे,वैभव पवळे,अनिल आधवडे,सुरेश नागरे,शिवसेना महिला आघाडी च्या ऊपतालुका संघटक मंजुश्री ढमाले,पोलिस पाटील स्वाती सुतार,ग्रामपंचायत सदस्य रेशमा गायकवाड,प्रीती शिंदे,प्रमोद बलकवडे,योगेश काशीलकर,रामदास पोळेकर,पोपट ववले,संभाजी ढमाले,पोपट ववले,शंकरराव ववले, जयसिंग गायकवाड,रासु शेलार,दिपक ववले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष राम गायकवाड,उत्सव प्रमुख संतोष शिंदे,शाखाप्रमुख राहुल धुमाळ, माजी सरपंच संतोष शिंदे,रोहिदास धुमाळ,नितीन थोरात,सुनील शिंदे, दयानंद शिरसाट,नितीन गायकवाड,संतोष काजंणे, विनयसिगं ,सुर्यकातं काकडे,यांनी केले होते.