धक्कादायक ! अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

ठाणे ||  अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील फर्डेपाडा या गावात घडली आहे.पारस अरुण फर्डे असं मृत्यू मुलाचं नाव आहे. 

पारस हा शेतकरी कुटुंबातील होता.गुरुवारी घरच्यांसोबत तो शेतावर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज कोसळल्यानंतर पारसला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने फर्डे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.