तर मगं तुमची जबाबदारी काय फक्त खंडणी वसूलीची का ? हर्षवर्धन पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

तर मगं तुमची जबाबदारी काय फक्त खंडणी वसूलीची का ?  हर्षवर्धन पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

पंढरपूर || सचिन वाझे यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी पत्रानंतर भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडी सरकारवर सर्व बाजूंनी टीकेची झुंबड उडाली आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वाझे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

वीज बिल भरायची, कोरोनामुक्त व्हायची, सुरक्षित राहायची,मास्क वापरायची,सोशल डिस्टन्सिंग पाळायची ही माझी जबाबदारी मग सरकारची नेमकी जबाबदारी काय? का फक्त खंडणी वसूल करायची एवढीच जबाबदारी का ? अशी बोचरी टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडनूक प्रचाराची सध्या रणधुमाळी चालू असून भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.07) रोजी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, वाखरी, कौठाळी, गादेगाव याठिकाणी नियोजीत सभेस आले होते. त्यावेळी सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले,की महाविकास आघाडी सरकारने अगोदर शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करु अशी आश्वासने दिली.दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची सोडून आता तेच सरकार शेतकऱ्यांनी वीज जोडणी खंडीत करत आहे. त्यामुळे आजची ही निवडणूक विकासाची आणि परिवर्तनाची आहे. मंगळवेढा-पंढरपूरचा विकास करायचा असेल तर समाधान आवताडे यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.