शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन छेडू - इंदापूरातील पालकांचा इशारा

शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन छेडू - इंदापूरातील पालकांचा इशारा

इंदापूर || सद्या एक वर्षापासून कोरोना विषाणूमुळे लोकाचां उद्योग धंदा,व्यवसाय बंद पडला तर कोणाचे गाळा भाडे निघत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला कवडीची किमंत नसल्याने अशा परिस्थितीत पालकांनी मुलांची फि भरायची का कुटुंब जगवायचे असा सवाल उपस्थित करत तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात यांनी शाळेची शैक्षणिक फि माफ करण्याची मागणी केलीय.

आज सोमवारी दि.19 रोजी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी तेजप्रुथ्वी ग्रुप संस्थापक अध्यक्ष नानासाहेब साहेबराव खरात,अप्पासाहेब माने ,संतोष कुभांर,प्रसाद पाध्ये,गणेश शिगांडे,महेश शिंदे,सपंत पुणेकर आदी उपस्थित होते.

शाळेने आता लाँक डाऊन च्या दिवसात फि भरण्या संदर्भात पालकांना फोन व मोबाईल वर संदेश पाठवण्यास सुरवात केली आहे. याचसोबत विविध शाळांनी फि भरलेल्या मुलांचे व न भरलेल्या मुलांचे असे दोन ग्रुप केले असून ज्यांनी फि भरली आहे त्यांना अभ्यासक्रम पाठवला जात असल्याचा दावा केलाय.तर ज्यांनी फि भरलेली नाही अशा वाँटस् अप ग्रुपला केवळ फि भरा असे एसएमएस पाठवले जात असल्याचे ही त्यांनी म्हटलंय.

शाळेकडून आपल्याला अभ्यास क्रम येत नाही म्हणून मुलं पालकांना त्रास देतात. आपण दुसऱ्या पेक्षा गरिब आहे ही भावना मुलांच्या मनावर कोरली जात आहे. या सर्वातुन घराघरात कलह ,भाडंण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शाळांना आदेश देऊन सुध्दा शाळा त्याला केराची टोपली दाखवत आहेत.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन  ज्या शाळा मुलांना फि मागतात अभ्यास क्रम पाठवत नाहीत त्या शाळांवर शासनाने कडक कारवाई करावी. अशी मागणी खरात यांसह इतर पालकांनी केली आहे. हि परिस्थिती बदलली नाही तर लाँक डाऊन मध्ये आदोंलन करण्याची आमच्यावर वेळ येऊ नये असा सूचक इशाराही देण्यात आलाय.