जग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी

जग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी

पिरंगुट || प्रत्येक व्यक्ती समजामध्ये कशी वागते हे खूप महत्त्वाचे असते.ती चांगली वागली तर त्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळणार जर वाईट वागली तर वाईटच फळ मिळणार.म्हणजेच आपण जे पेराल तेच उगवणार आहे त्यामुळे हे संपुर्ण जग हे प्रत्येकाच्या कर्माची शेतीच आहे असे गौरवोद्गार भोसरी सेंटरच्या करुणा दीदी यांनी काढले.

लवळे (ता,मुळशी ) या ठिकाणी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्था अंतर्गत राऊतवाडी यांच्यावतीने अनुभूती धाम या सेंटरला स्वातंत्र्य अमृत महोत्सव व जानकी दादी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आध्यात्मिक कार्यक्रमासह झेंडा वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होते.तेव्हा या कार्यक्रमादरम्यान केक कटिंग व शिव ध्वजारोहणाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

 तेव्हा या कार्यक्रमाला भोसरी सेंटरच्या संचालिका राजयोगी करुणा दीदी यांच्या सह लवळ्याचे सरपंच निलेश गावडे,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय सातव,ग्रा.सदस्या वर्षा राऊत,चिंचवड सेंटरच्या अश्विनी बहिण,बीके ज्योती दीदी,आनंद मेडिकल चे डायरेक्टर डॉ.गणेश जाधव,माजी ग्रा.सदस्य मोहन शिंदे,शंकर भाईजी,नवनाथ भाईजी,कृषी अधिकारी प्रकाश राऊत,संतोष पोटे अनेक महिला वर्ग,पुरुष वर्ग व बालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख शहाणे यांनी केले तर पिरंगुट सेंटरच्या संचालिका ज्योती दीदी यांनी आभार प्रदर्शन केले.