नेहमीप्रमाणे यावेळी ही मामा मदतीला धावून आला आणि जमखींचा जीव वाचला

नेहमीप्रमाणे यावेळी ही मामा मदतीला धावून आला आणि जमखींचा जीव वाचला

इंदापूर || इंदापूर - बारामती राज्य महामार्गावर सोनमाथा या ठिकाणी दुचाकीस्वार इंदापूर च्या दिशेने जात असताना वेगाचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्याकडेला पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार अनिल दोभाडा हे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार दि.06 आँक्टोंबर रोजी घडली. 

अनिल दोभाडा हे आपले पिंपळनेर येथील मित्र डाॅ.अधिराज शहा यांसोबत (दुचाकी नंबर एम.एस.45 ए.एम.2995) या दुचाकीवरुन इंदापूर बारामती राज्य महामार्गाने इंदापूरला येत होते.दरम्यान सोनमाथा या ठिकाणी आल्यावर वेगाचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्याकडेला पलटी झाली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जखमी झाले.

या दरम्यान रस्त्याच्या कडेला जाणारे-येणारे बघ्याची भुमिका घेत होते.दरम्यान याच मार्गावरून काही पत्रकार या मार्गे येत होते. त्यांनी हा अपघात पाहिला आणि संकटसमयी धावून येणाऱ्या नितीन मामा खिलारे यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर इंदापूर शहरातील पांडुरंग रामचंद्र खिल्लारे गुरुजी प्रतिष्ठान संचलित चालणारी रुग्णवाहिका चालक नितीन खिल्लारे घेऊन काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने जखमींना पुढील उपचारासाठी वेळेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जर वेळेत रुग्णवाहिका चालक नितीन खिलारे आले नसते तर जखमींच्या जीवितास धोका निर्माण झाला असता मात्र खिलारे यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अपघातग्रस्तींना वेळेत उपचार मिळाले असे सुनिल शहा यांनी सांगितले.