खुशखबर ; उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे.

खुशखबर ; उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे.
Ujani Dam

इंदापूर ता.25 : पुणे,सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरणार्‍या उजनी धरणात यंदा भीमा खोर्‍यातून येणारा पाण्याचा प्रवाह हा अत्यंत कमी असल्याने नेहमी आँगस्ट महीन्यात पहील्याच पंधरवाड्यात शंभर टक्के भरणारे उजनी धरण आज मितीला त्या वाटचालीकडे आहे. तिन्ही जिल्ह्यासाठी  महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पात आज दि.25 आँगस्ट रोजी सकाळी सहा वाजता एकूण पाणी साठा 109.12 टी.एम.सी.इतका झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी तो 121.44 टी.एम.सी.इतका होता.मात्र असे असले तरी पुढील काही दिवसात उजनी शंभर टक्के भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मंगळवार दि.25 आँगस्ट रोजी सकाळी सहा वाजता धरणातील पाणी साठा 84.85 % इतका आहे. जो मागील वर्षी याच दिवशी 107.85 %. इतका होता. मागील काही दिवसापासून उजनी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने उजनी धरणात दौंडजवळून मिसणारी पाण्याची आवक केवळ 13 हजार 409 क्युसेक इतकीच आहे. तर बंडगार्डन पुणे येथील विसर्ग ही मंदावून आता 0 क्युसेक इतका झाला आहे.

चार सप्ताहात भीमा व नीरा खोर्‍यात पावसाचा दोन-तीन दिवस जोर राहिला मात्र नंतर तेथे ही पर्जन्यमान थंडावले.  या दरम्यान उजनीत येणारा बंडगार्डन व दौंड जवळची येणारी आवक मोठ्या तीव्रतेने होती. नंतर मात्र पावसाचा वेग मदावल्याने येणारी आवक घटली. मात्र असे असले तरी अगदी काही दिवसात उजनी धरण टाचोटाच भरणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

उजनी धरणाची 25 आँगस्ट 2020 ची स्थिती सकाळी 6 वाजता :
एकूण पाणी पातळी : 496.125 मीटर
एकूण क्षेत्रफळ – 315.63 चौ. कि. मी.
एकूण पाणीसाठा  – 3090.20 द.ल.घ.मी.
एकुण पाणीसाठा  – 109.12 टी.एम.सी.
उपयुक्त साठा   –   1287.38 द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा   –  45.46 टी.एम.सी.
टक्केवारी      –  84.85 टक्के
बंडगार्डन विसर्ग : 0 क्युसेक्स्
दौंड विसर्ग : 13409 क्युसेक्स्

मागील वर्षी याच दिवशीची स्थिती :

एकूण पाणी पातळी : 497.180 मीटर
एकूण पाणीसाठा  – 3439.13 द.ल.घ.मी.
एकुण पाणीसाठा  – 121.44 टी.एम.सी.
उपयुक्त साठा   –   1636.32 द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा   –  57.78 टी.एम.सी.
टक्केवारी      –  107.85 टक्के
बंडगार्डन विसर्ग : 0 क्युसेक्स्
दौंड विसर्ग : 3458 क्युसेक्स्