मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात लसीकरण 

मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात लसीकरण 

इंदापूर || शासनाच्या मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत आरोग्य विभागाच्या सहकार्याने विशेष कोविड मोहिमेची अंमलबजावणी सप्तपदी राबविण्यात येणार आहे.त्यानुसार मंगळवार दि.12 आँक्टोंबर रोजी इंदापूर शहरात प्रभाग क्र.१ मधील  एम.एस.ई.बी.समोरील अंगणवाडी शाळा,महतीनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदीर, प्रभाग क्र.२ मधील श्रीनाथ हौसिंग सोसायटी येथील  समाज मंदीर व सोनाई नगर येथील गणेश मंदीरात हे लसीकरण राबवण्यात येत आहे. 

या लसीकरण शिबीरास मुख्याधिकारी रामराजे कापरे,तहसीलदार श्रीकांत पाटील,नगराध्यक्षा अंकिता शहा,उपनगराध्यक्षा धनंजय पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सामजिक कार्यकर्ते रमेश धोत्रे,नितीन मखरे आदींनी भेट देत पाहणी केली. 

इंदापूर शहरात शासनाच्या कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर शहरात दि.12 आँक्टोंबर ते दि.15 या कालावधीत विविध ठिकाणी लसीकरण शिबीरे आयोजीत करण्यात आले असून कोरोनाला शहरातून हद्दपार करण्यासाठी इंदापूर शहरातील नागरिकांनी ज्यांचे लसीकरण राहिले आहेत त्यांनी या शिबीरात लस टोचून घ्यावी. व या मोहिमेस हातभार लावावा असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे.

इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी यांसह अंकुश बाळगाणुरे,आजिम तांबोळी,आशुतोश देवकर,वृक्षाली नवगिरे,अजय जगताप,वर्षा जाधव आदी हे लसीकरण पार पाडणार आहेत.दि.13 रोजी प्रभाग क्र.3 मधील - महादेव मंदीर ४० फुटी रोड,चाणक्य गणेश मंदीर, अंबिकानगर प्रभाग क्र.4 मधील मंडई (बागवान गल्ली),श्री दत्त मंदीर, मेन रोड, दि.14 रोजी प्रभाग क्र.5 मधील श्री व्यंकटेश मंदीर, व्यंकटेशनगर व आयाज शेख इमारत, तळ राजेवलीनगर, प्रभाग क्र.6 मधील श्री संत नामदेव मंदीर, कासारपट्टा व पोरापोरांची वावडी, दि.15 रोजी प्रभाग क्र.7 मधील श्री संत सावतामाळी मंदीर व इंगोले मैदान, प्रभाग क्र.8 मध्ये जि. प. शाळा सरस्वतीनगर व देवी मंदीर शाहू नगर, बारामती रोड या ठिकाणी हे लसीकरण पार पडणार आहे.